धक्कादायक: रेल्वेत भीक मागणाऱ्या महिलेवर अमानुष अत्याचार; अमळनेर तालुक्यातील घटना…!

---Advertisement---

 

अमळनेर तालुक्यातून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एका युवकाने अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मध्यप्रदेशातील २८ वर्षीय मागासवर्गीय पीडिता ही रेल्वे प्रवासादरम्यान भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत होती. अमळनेर येथे तिची ओळख आरोपी युवकाशी झाली होती. ओळखीचे रूपांतर हळूहळू वारंवार भेटींमध्ये झाले. आरोपी तिला जेवण व काही पैसे देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. ६ तारखेला सकाळी पीडिता बऱ्हाणपूरहून रेल्वेने धार येथे पोहोचली असता आरोपीने तिला रेल्वेतून उतरवून घेतले. त्यानंतर मोटारसायकलवरून मित्रासह तिला धार येथील एका दर्ग्याजवळ नेण्यात आले. तेथे निर्जन ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या झोपडीत आरोपीने मद्यप्राशन करून पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली.

पीडितेने स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यावर मारहाण करत जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने तिला पुन्हा रेल्वे स्थानकावर सोडून दिले. मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत पीडितेने अमळनेर पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार उघड केला.

घटनास्थळ मध्यप्रदेशातील पोलीस हद्दीत येत असल्याने संबंधित पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमांखाली तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---