---Advertisement---

महापालिकेत लिफ्ट बसवितांना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा ; माजी नगरसेवक सुनील माळी यांची मागणी

---Advertisement---

जळगाव : जळगाव महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीत लिफ्ट बसवितांना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सुनील माळी यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना दिले आहे.

माजी नगरसेवक सुनील माळी यांनी दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत २०१८ ते २०१९ या कार्यकाळात तीन ते साडेतीन कोटी रुपये खर्च करून सहा लिफ्ट बसविण्यात आलेल्या आहेत. या अगोदर बसविण्यात आलेल्या सन २००० सालातील लिफ्ट सुस्थितीत असतांना व त्यांची किरकोळ दुरुस्ती करून त्या लिफ्ट अजून १० ते १५ वर्ष चालू शकल्या असत्या.

---Advertisement---

परंतु, तसे न करता निव्वळ मनपाच्या पर्यायाने जनतेच्या करातून जमा झालेला पैसा सत्ताधारी यांनी स्वतःच्या घश्यात टाकण्याच्या वाईट हेतूने सर्वच्या सर्व लिफ्ट बदलवून मनपाच्या तिजोरीवर डाका टाकला आहे. या लिफ्ट बसविण्याकामी १६ मजली लिफ्ट बसविण्याचा अनुभव असलेल्या मक्तेदाराला डावलून मर्जीतील मक्तेदाराला काम देण्यात आले. ज्या दिवशी लिफ्ट बसविण्यात आल्या त्यांच्या ८ ते १५ दिवसातच लिफ्ट नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले.

याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या दबावाने याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. मनपातील लिफ्ट नेहमीच नादुरुस्त का होतात, याचा उलगडा होणे गरजेचे आहे. पुढील काळात या लिफ्टमध्ये जिवितहानी झाल्यास त्या काळातील लोक्ातिनिर्धीना दोषी धरण्यात यावे व झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---