महायुतीत भाकरी फिरण्याची शक्यता? मंत्रिमंडळातून शिंदेंच्या दोन मंत्रांना डच्चू मिळणार? आणि त्या जागी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार?

---Advertisement---

 

महायुतीच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळण्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राज्यातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता पुढील काळात महायुती सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपा हे आपल्या कोट्यातील काही मंत्रांना बदलून आगामी निवडणुका आणि मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांकडून समजतंय.

त्यामुळे आता मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुका आणि मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा हा विद्यमान मंत्र्यांना धोकादायक ठरू शकतो. याच कामगिरीचा आढावा घेऊन विद्यमान मंत्रांना डच्चू दिल्या जाण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने शिंदेंचे शिवसेना आणि भाजपा पक्षात अंतर्गत फेरबदल होणार असल्याची सध्या चर्चा आहे.

भाजपा पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार असल्याचं बोललं जात आहे सध्या ते प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत पुन्हा एकदा त्यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकतो अशी शक्यता आहे रवींद्र चव्हाण यांना मंत्री त्यांच्या जागी विदर्भ किंवा मराठवाडा विभागातील एका नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार अशी शक्यता आहे भाजपाच्या कोट्यातील काही विद्यमान कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या कामगिरीमुळे त्यांना पदावरून हटवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसेना पक्षातील मंत्र्यांच्या कामकाजावर सध्या नाराज असल्याचं समोर आला आहे यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाठ यांच्या नावाची चर्चा आहे आणि या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांवर मंत्रिपदाबाबत टांगती तलवार असल्याचं समोर आलं आहे. शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेत्यांना संघटनात्मक कामांसाठी मुक्त केले जाणार असल्याचं कळतंय. यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या मंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात शिवसेना पक्षाला अपेक्षित यश मिळाल नाही. अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून पायउतार व्हावं लागणार आहे.

आगामी काळातील निवडणुका पाहता विदर्भ, मराठवाडा या भागात जास्तीत जास्त परिस्थितीत देणारी नेते हे भाजपा देणार असल्याचं विचाराधीन आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीत विदर्भ मराठवाडा विया विभागांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं यासह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आलेल्या मंत्रिपदा बाबतही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे होणाऱ्या या बदलामुळे महायुतीतील अनेक इच्छुक आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी विद्यमान मंत्र्यांची मात्र धाकधूक चांगलीच वाढली आहे. आगामी काळात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---