जीवदान देणाऱ्या ओम पाटीलच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन उचलणार

---Advertisement---

 

अनेर नदीत बुडणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांचे प्राण वाचवून धाडसाचे उदाहरण ठरलेल्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14) याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडने स्वीकारली आहे. तसेच ओमच्या या अतुलनीय धाडसाबद्दल कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते त्याचा गौरवही करण्यात येणार आहे.


चोपडा तालुक्यातील गणपूर येथील चार मुले अनेर नदीत आंघोळीसाठी उतरली होती. मात्र पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. याच वेळी तिथून जात असलेल्या ओम पाटीलने क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली आणि एकामागून एक चारही मुलांना सुरक्षित बाहेर काढले. त्याच्या या शौर्यामुळे चार कुटुंबांवर आलेले संकट टळले.


ओम सध्या गावातील विकास विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत त्याचे शिक्षण सुरू असून त्याचे वडील रवींद्र पाटील व आई सारलाबाई शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने शिक्षणासाठी अनेक अडचणी येत होत्या.


ओमच्या या धाडसाची बातमी माध्यमांतून समोर येताच जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दखल घेतली. त्यांनी जाहीर केले की, ओमच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येईल.


कोट:
“संपत्तीपेक्षा मनाचा मोठेपणा महत्त्वाचा आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जैन इरिगेशन नेहमीच मदतीचा हात देत आहे,”
— अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड


ओम पाटीलच्या धाडसामुळे एकीकडे चार जीव वाचले, तर दुसरीकडे त्याच्या शिक्षणाचे स्वप्नही आता पूर्ण होणार आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---