---Advertisement---

Jalgaon Accident News : पायी जाणाऱ्या जैन मुनींना दुचाकीची धडक, दोघे जखमी

by team
---Advertisement---

जळगाव : शहरातून जाणाऱ्या  राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच अपघात होत असतात. या अपघातात अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. यातच पुन्हा मनराज पार्कजवळ मोटरसायकल घसरुन अपघात झाला आहे. मोटरसायकलची धडक बसल्याने पायी जाणारे जैन मुनींसह दुचाकीस्वार देखील जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर पाटील (रा. वैष्णवी पार्क परिसर) हे मेहरुण परिसरातील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ते दुचाकी (क्रमांक एमएच.१९.डीजी.५७६२) ने जळगाव शहराकडे जात होते. यातच मानराज पार्कजवळ साईड पट्टीवरून त्यांची दुचाकी घसरली. यावेळी त्यांचा तोल गेला. त्यांची दुचाकी पायी चालत असलेले जैन मुनी भुषण मुनी यांना जाऊन धडकली.

या अपघातात ईश्वर पाटील आणि भुषण मुनी दोघे जखमी झाले आहेत  ॲड. कुणाल पवार आणि नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारार्थ जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक अमर जैन यांच्यासह जैन समाजातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. महामार्गाच्या साईडपट्ट्या खोल गेल्या असून महामार्ग प्राधिकरणाला त्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून येते.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment