---Advertisement---

Jalgaon BJP : संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजप आक्रमक, दहन केला पुतळा, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या विषयी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केले होते. खासदार संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा भाजपतर्फे शुक्रवार ( ६ जून) निषेध करीत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विषयी बेताल वक्तव्य केले आहे. याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे कोर्ट चौकात संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने खा. संजय राऊत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
आ. सुरेश भोळे यांच्या नेतृतखाली भाजपा जिल्हा कार्यलयातून कोर्ट चौकात मोर्चा नेण्यात आला. यावेळी खा. राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोर्ट चौकात आल्यावर संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याचे दहन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी यावेळी तरुण भारत लाईव्हशी बोलतांना सांगितले की, महाराष्ट्राचे संकट मोचक, सर्वांचे लाडके नेते ना. गिरीश महाजन यांच्याबद्दल संजय राऊत हे बकाल वक्तव्य करत होते. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संस्कार, संस्कृती काढतात, त्यांनी आधी त्यांची स्वतः ची संस्कृती, संस्कार प्रथम पाहावेत. सकाळी नऊ वाजले की, त्यांचा भोंगा सुरु होतो. ते काय काम करतात हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. ना. माहजन हे सर्वांना मदत करतात हे सर्वश्रुत आहे. दुष्काळ असो, पूर परिस्थिती असो ना. महाजन हे नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. अशा नेहमी मदत करणाऱ्या व्यक्तीबद्दल संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केले आहे. त्यांनी पुन्हा असे काही केले तर त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून केवळ त्यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे, भविष्यात जर त्यांनी पुन्हा असे केले तर ते जळगावात आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी आमदार सुरेश भोळे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सदाशिव ढेकळे, विशाल त्रिपाठी, भगत बलानी, अजित राणे, राजू मराठे, जितेंद्र मराठे, भरत सपकाळे, रेखा कुलकर्णी, कांचन सोनवणे, संगीता पाटील, विनोद मराठे, आनंद सपकाळे यांच्यासह पदा अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment