---Advertisement---
जळगाव : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या जळगाव शाखेतर्फे मंगळवारी (१ जुलै ) रोजी ७७ वा “सी.ए. दिवस” अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष हितेश आगीवाल यांच्या हस्ते सी. ए. असोसीएशन चा झेंडा फडकवण्यात आला. यावेळी जळगाव सी.ए. शाखेचे उपाध्यक्ष व सी.ए. विद्यार्थी शाखा अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल, सचिव सी. ए. सोहन नेहेते, खजिनदार सी. ए. लक्ष्मिकांत लाहोटी, कार्यकारी मंडळ सदस्य सी. ए. करण काबरा, सी. ए. नचिकेत जाखेटीया, सहकारी सदस्य सी.ए. हितेश जैन तसेच सर्व सी.ए. सभासद व सी.ए. विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर “वर्क लाईफ बॅलन्स” हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे, आरोग्य विभागाचे ‘ब्रँड अॅम्बेसडर’ मुकुंद गोसावी यांची उपस्थित होती. प्रास्ताविक जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष . हितेश आगीवाल यांनी केले. यावर्षी सी.ए. दिन सप्ताह अंतर्गत अनेक सामाजिक व व्यावसायिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गंत वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, हास्य योग सत्र, MSME व कर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
---Advertisement---
यावेळी मुकुंद गोसावी यांनी मार्गदर्शन केले. मुख्य अतिथी इती पांडे यांनी ICAI चं ” प्रामाणिकपणा, स्वायत्तता, उत्कृष्टता ” हे त्रिसूत्र जगातील प्रत्येक व्यावसायिक क्षेत्राला प्रेरणा देऊ शकते. आज ICAI च्या माध्यमातून केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर समाजासाठीही अनेक उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. याप्रसंगी जळगाव सी.ए. शाखेच्या ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ६ ज्येष्ठ सी.ए. सभासदांचा सत्कार करण्यात आला. मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इनडोअर स्पोर्ट्स मीट, सी.ए. विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या पिच डेक, वादविवाद, वक्तृत्व व निबंध स्पर्धा तसेच योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा यामध्ये विजेते झालेल्या सी. ए. सभासदांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रक्तदान, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. यशस्वीतेसाठी सी.ए. कार्यकारी मंडळ, सहकारी सदस्य यांचे विशेष योगदान लाभले. तसेच सर्व सी.ए. सदस्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी “बचपन RETURNS — CA Day SPECIAL” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वीतेसाठी जळगाव सी.ए. शाखेची व्यवस्थापन समिती तसेच सी.ए विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.