---Advertisement---

Jalgaon Crime : एमडी ड्रग्स प्रकरण! २३ ग्रॅम एमडी ड्रग्ससह तिघे पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

Jalgaon Crime : शहरात एमडी ड्रग्सची विक्री करणारे ड्रग्समाफीया आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एमडी ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी मोठी करवाई करत आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. यासह भुसावळ शहरातून अटक केलेल्या आरोपीच्या घरातून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई जळगाव शहराचे डीवायएसपी संदीप गावित व त्यांच्या टीमने शनिवारी (३ मे) सकाळी ३ वाजेपर्यंत केली. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या संशयितांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील शाहूनगरमध्ये शहर पोलीस स्टेशनने धाड टाकली होती . या कारवाईत पोलिसांकडून ड्रग्स जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सरफराज याला अटक केली. दरम्यान त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता चौकशीमध्ये याकूब याचे नाव समोर आले. त्यानुसार पोलिसांनी याकूबवर पाळत ठेवली याकूब जळगावात आला असता पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक करून चौकशी केली. या चौकशीत भुसावळातील अन्सार भिती, वसीम खान यांची नावे समोर आली. पोलिसांनी वसीम खान यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.

या कारवाईमध्ये डीवायएसपी संदीप गावित, शहर पोलीस स्टेशनचे एपीआय नाईक, रीडर गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांसह फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी उपस्थित होती. तिन्ही संशयित आरोपींना दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment