Jalgaon Crime News : चहा बनविताना काळाचा घाला; हृदयविकाराच्या झटक्याने परप्रांतीय विक्रेत्याचा मृत्यू

जळगाव । येथे परराज्यातील चहा विक्रेत्याचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू ओढावल्याही दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद अमाला पांडे (४९, मूळ रा. उत्तरप्रदेश, ह.मु. जळगाव) असे मयत झालेल्या चहा विक्रेत्याचे नाव आहे.

शुक्रवारी ट्रान्सपोर्ट नगरात अरविंद पांडे हे दुकानावर चहा बनवीत होते. यावेळी त्यांना चहा बनविता ह्रदयविकाराचा झटका आला. यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जाऊन ते स्टोवर पडले. यामुळे त्यांच्या मानेजवळ भाजल्या गेले. ही घटना शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी ट्रान्सपोर्टनगर जवळ घडली.

उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले अरविंद पांडे हे सध्या जळगावात व्यवसायानिमित्ताने राहत होते. फिरत्या चहा दुकानावर ते व्यवसाय करीत होते. ते शुक्रवारी याच फिरत्या चहाच्या दुकानावर काम करत होते. यावेळी ते दूध गरम करीत होते. याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते पेटत्या स्टोवर पडले. त्यामुळे त्यांच्या मानेजवळ भाजले गेले. ही घटना लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलि सस्टेशनला  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी करीत आहेत.