जळगाव : शहरतात सोनसाखळी चोरी घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. बुधवार २३ रोजी भोईटे नगरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. अशा स्वरुपाच्या चोऱ्या शहरातील कॉलनी परिसरात घडत असल्याच्या घटना उघड होत आहेत. त्यातच शहरातील नेहमीच गजबजलेला परिसर असलेल्या सुभाष चौकात सायंकाळी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सुभाष चौकात असलेल्या आर.सी.बाफना शोरूमसमोरील रस्त्यावर एक महिला उभी होती. त्या महिलेच्या पर्समधून मोबाईल आणि ५ हजारांची रोकड अशा किंमतीचा मुद्देमाल घेऊन चोरट्याने पोबारा केला होता. हि घटना गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भर रस्त्यात घडली. नेहमीच वर्दळ असलेल्या सुभाष चौकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
सुभाष चौकातील या चोरीच्या प्रकरणात सायंकाळी ५.३० वाजता शनीपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनिता सुधिर इंगळे (वय ४३ रा. जोशी कॉलनी, जळगाव) ही महिला गुरूवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आर.सी. बाफना शोरूम समोरील रस्त्यावर उभी होती. यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा उचलत त्यांच्या पर्समधील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि ५ हजारांची रोकड असा एकुण १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. सायंकाळी ५.३० त्यांनी शनीपेठ पोलीसस्टेशनलायेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे करीत आहे.