जळगाव : मोटरसायकल चोरी प्रकरणी कठोर येथील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पाच वर्षांपूर्वी मोटारसायल चोरी प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात व पुणे येथे गुन्हा दाखल आहे.
जळगाव मधील शनिपेठ येथील रहिवाशी प्रशांत सानप यांची सन २०१८ साली सीडी डिलक्स मोटर सायकल (एमएच 19 बीई 6230) आव्हाणे शिवारातून चोरटयांनी चोरुन नेली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोटर सायकल चोरी प्रकरणात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार जिवन गोकुळ शिंदे (रा. कठोरा ता . जळगाव ) याच्याकडे चोरीच्या दोन मोटार सायकली असल्याचे समजले.
यावरुन कठोरा येथुन जिवन शिंदे यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याला त्याच्या जवळ असलेल्या दोन्ही मोटार सायकलबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पोलिसांनी या दोन्ही मोटार सायकलींची अधिक माहिती काढली असतात सीडी डीलक्स गाडी ही शनी पेठ येथील प्रशांत सानप यांच्या मालकीची असल्याचे उघड झाले. या मोटर सायकल सोबत अजून एक एमएच सीडी डीलक्स
त्याचेकडे असलेल्या दोन्ही मोटार सायकलींबाबत विचारपुस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने दोन्ही मोटार सायकलींची माहीती काढली असता सीडी डीलक्स मोटर सायकल क्रमांक एमएच 19 बीई 6230 ही प्रशांत सानप रा. शनीपेठ जळगाव यांच्या मालकिची आढळून आली. यासोबत अजुन एक एमएच 12 जीएच 0897 या क्रमांकाची सीडी डीलक्स मोटर सायकल जीवन शिंदे यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. ही मोटर सायकल ही सुरेश वासुदेव इंगळे रा दशरथनगर विश्रांतवाडी पुणे यांच्या नावावर तपासात निष्पन्न झाले आहे.
या दोन्ही मोटार सायकलींबाबत जळगाव तालुका पोलिस स्टेशनला एक गुन्हा व एक पुणे येथे दाखल आहे. आरोपी जिवन गोकुळ शिंदे यास जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात मोटार सायकल सह देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोहेका, गणेश शिरसाळे, जमीर शेख, किशोर पाटील, पोका नाना तायडे, गणेश ठाकरे, नितीन ठाकरे, किरण पाटील विकास सातदीवे, योगेश बारी यांनी केली आहे.