---Advertisement---
Jalgaon Crime : दिल्ली पोलीस बोलतोय, तुमच्या बँक खात्याचा मनी लॉड्रिंग साठी वापर केला आहे, असा बनाव करून सायबर ठगानी जळगाव जिल्ह्यातील एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला ३१ लाख ५० हजार रुपयांचा ऑन लाइन गंडा घातला.
७३ वर्षीय सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी हे चाळीसगाव येथे वास्तव्यास आहेत. १६ जून २०२५ ते २३ जून २०२५ जून या कालावधीत या निवृत्त अधिकाऱ्याच्या मोबाईलवर त्यांना कॉल आला. मी सुनील कुमार बोलतोय,असे त्याचे नाव सांगितले. त्यानंतर त्याच्या एका साथीदाराने या निवृत्त अधिकाऱ्याला व्हॉट्स ॲप व्हिडीओ कॉल केला. व्हॉट्स ॲप चॅट करून तो म्हणाला, मी दिल्ली पोलीस बोलत आहे. तुमचे बँक खाते मनी लॉड्रिंग साठी वापरण्यात आले आहे. त्या नुसार तुमची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तुम्हाला अटक होईल, असे खोटे ठगाणी सांगितल्याने निवृत्त अधिकारी गर्भगळीत झाले.
आम्ही तुम्हाला यातून सुरक्षितरित्या बाहेर काढू शकतो. त्यासाठी तुम्हाला आम्ही सांगतो तसे ऐकावे लागेल. अन्यथा तुमच्यावर कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा बनाव केला. वैद्यकीय अधिकाऱ्याचा विश्र्वास संपादन करून सायबर ठगानी त्यांच्या कडून वेळोवेळी ३१ लाख ५० हजार रुपये ऑnलाईन घेऊन संपर्क बंद केला. ३१लाखाहून अधिक रक्कम गमावल्यानंतर फसवणूक झाल्याचे निवृत्त अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार केली.त्यानुसार मंगळवारी (२४ जून) सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे तपास करीत आहेत.
जाळ्यात आला तो फसला
सायबर ठग हे नेहमी ग्राहकांना फसविण्यासाठी ऑन लाईन लोकांच्या खात्यावर लक्ष ठेवून असतात. ते आधी मोबाईलवर संपर्क करतात. सीबीआय अधिकारी, मी मुंबई क्राईम ब्रँच मधून पोलीस निरीक्षक बोलत आहे, असे खोटे सांगून ग्राहकाला ईडीचा, अटक करण्याचा किंवा तुम्ही आता आमच्या कैदेत आहेत, अशा थापा मारतात. आम्हीच तुमची यातून सुटका करू शकतो, असा दावा करून ते विश्वासास घेत ग्राहकाला त्यांच्या जाळ्यात घेतात. त्यांनतर ग्राहकाच्या खात्यातील रक्कम ऑन लाईन घेऊन फसवणूक करतात. कोणीही पोलीस अधिकारी किंवा बँक अधिकारी अशी भीती चे कॉल कोणालाही करीत नाही. लोकांनी दक्ष रहावे आणि सायबर ढगांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये.त्यामुळे आपले पैसे सुरक्षित राहु शकतील.