---Advertisement---

Jalgaon Crime : गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह दोघांना अटक

---Advertisement---

Jalgaon Crime : जळगाव शहरातील सदाशिव नगरातील ओम पान सेंटरसमोर बेकायदेशीरपणे हातात गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतूस बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना शनिपेठ पोलिसांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता अटक केली. राकेश दिलीप भावसार (४१, रा. सदाशिव नगर) व प्रसाद संजय महाजन (२८, रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदाशिव नगरातील पान सेंटरसमोर संशयीत राकेश हा बेकायदेशीरपणे हातात गावठी बनावटीचे पिस्टल व चार काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीसांना मिळाली.
पथकाने मंगळवारी दुपारी १२ वाजता कारवाई करीत आरोपीला अटक केली व त्याने ५४ हजारात संशयित प्रसादकडून पिस्टल विकत घेतल्याची कबुली दिल्याने त्यासही अटक करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल पराग दुसाने यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या म ओम ार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार युवराज कोळी, हवालदार रवींद्र बोदवडे, हवालदार शशिकांत पाटील, कॉन्स्टेबल अनिल कांबळे, कॉन्स्टेबल पराग दुसाने आदींच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment