---Advertisement---

Jalgaon Crime : लग्नात तरुणाची फसवणूक, संशयितांना पोलीस कोठडी

---Advertisement---

Jalgaon Crime : दोन लाख रुपये रोख आणि चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन मध्यस्थींनी तरुणीसोबत कोल्हापूर येथील तरुणाचे लग्न लावले. त्यानंतर या तरुणाची फसवणूक केली. या प्रकरणी अटकेतील संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

शहरातील हरिविठ्ठल नगरातील मुलीचे कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून दिले व नंतर लग्नासाठी दिलेले पैसे तसेच सोने परत देण्याचा तगादा लावल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून फरार सुजाता ठाकूर या महिलेचा शोध घेतला जात आहे.

दोन लाख रुपये रोख आणि चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन तरुणी सोबत लग्न लावून देत कोल्हापूर येथील तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मिनाक्षी उर्फ मनिषा दिनेश जैन उर्फ पल्लवी राजपूत (वय ३३, रा. विवेक कॉलनी, गाडगेबाबा चौक) व रमा सुशील कनौजिया (वय ३६, रा. चुंचाळे शिवार, नाशिक) या दोघं संशयित महिलांना रविवारी पोलिसांनी अटक केली होती. या दोघींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

बेपत्ता असलेल्या पीडित मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तीने कोल्हापूर येथे विवाहानंतर तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार तिच्या पतीसह सात जणांविरुद्ध पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या पीडितेचा पती आशिष गंगाधरे व मीना सुरेश जैन या दोघांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर केले. त्यानुसार न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---