मुंबई : राज्यात बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बोगस जन्म-मृत्यूनोंदणीचे प्रकार गाजत असताना आता जळगाव महानगरपालिका हद्दीत बोगस जन्मनोंदप्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. येथे ४३ बांगलादेशींवर विविध कलमांन्वये शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार यांच्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
जन्म-मृत्यूनोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जळगाव यांच्या बनावट सह्यांच्या आधारे जन्म-मृत्यूनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी बनावट सहीचे आदेश बनविल्याची धक्कादायक बाब जळगाव महानगरपालिकेचे सामान्य प्रशासन उपायुक्त यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही बाब जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांना पत्र पाठवून निदर्शनास आणून दिली. तसेच ५० अर्जदारांची यादी आणि आदेशाच्या छायांकित प्रती पडताळणीसाठी तहसीलदारांना पाठवून दिल्या. त्याची पडताळणी केल्यानंतर तहसीलदारांच्या पत्रानुसार नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार, (वय ५३ वर्षे) यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री तक्रार नोंदविली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत, चांद मोहम्मद प्यारजी बागव, असलम खान सादीक खान, अशफाक बुढान बागवान, कनिज रज्जाबी अब्दुलगनी, बुशरा खान मोहम्मद इस्लाउद, मोहसीन चांद मोहम्मद, निगार सुलताना हफिज खान, समीर खान आयुब खान, नसरिन बानो आयुब खान, अफझलखान अय्युब खान, नंदिमखान हफिजखान, शिरीष बानो फरीक शाह, आरीफ खान इसा खान, खान असुदुल्ला खान हाफीज, शाह आसिफ अहमद, शमशेर बेग तुराब बेग, तौसिफ शहा जनिजला शाहा, तुराब वेग गुलाब वेग, शहनाज वी शेख मुनीर, वाहेदाबी अब्दुलगनी, अब्दुल्ला असगर अली सैय्यद, नुसरत बानो, जबीउल्ला शाहा, शाहा आयाज अहमद अब्दुल अजीज, मोहम्मद वसीम जबीमुल्ला शाहा, मोहम्मद जफर जबीउल्ला शाहा, जनीक परवीन अमानउल्ला शाहा, बिसमिल्लाह खान, शेख सलीम शेख बसीर, शेख अनीस शेख बसीर, मोहम्मद अकील शेख बसीर, मोहम्मद कलीम शेख बसीर, शरीफ नईमोद्दीन, मोहम्मद शकील शेख बसीर, अमरीन रशिद पटेल, जाकीर फकीर मोहम्मद तांबोळी, तबस्सुम परवीन मोहम्मद इकबाल, शेख मोहम्मद इकबाल अब्दुल रहीम, राहल नाज जबीउल्ला शाहा, अंजुमबी शेख फरीद, तसलीमा बी शेख यासिम, शोहरत अली शरीफ मुनसारी, शेख शानदोस शेख ईसाक या बेकायदा वास्तव करणार्या बांगलादेशींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोषी बांगलादेशींवर कारवाई करणार
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने बांगलादेशींविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये जन्मप्रमाणपत्र घोटाळा असल्याचे उघड झाले. त्यातील हा १७ वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजे १७ ठिकाणी बांगलादेशींनी बोगस जन्मप्रमाणपत्रे मिळवली. या सगळ्यांवर कारवाई होऊन त्यांना पुन्हा मायदेशात पाठवणार.
किरीट सोमय्या, माजी खासदार भाजप