Jalgaon News: जळगावात डंपरने नऊ वर्षीय चिमुकल्याला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटविला

#image_title

Jalgaon Accident News: जळगावतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपघाताशी संबंधित ही बातमी असून याठिकाणी एका भरधाव डंपरने एका बालकाला चिरडल्याचा प्रकार घडला आहे. या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक आशी ही घटना बुधवार, 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.15 मिनिटांनी शहरातील कालिकामाता मंदिर चौकात घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त जमावाने उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या बाबात माहिती अशी की, मयत ९ वर्षीय चिमुकला हा जेवणाचे पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात होता. दरम्यान, हा अपघात घडला. या अपघातात ९ वर्षीय चिमुकला जागीच ठार तर सोबत असलेली त्याची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले आहे. योजस धीरज बऱ्हाटे (वय-९ रा.लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत मुलाचे नाव आहे. योजस हा मुलगा आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवारी ते त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजस बऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला.

जमावाने पेटवला डंपर

ही घटना लक्षात येताच त्या ठिकाणी मोठा जमाव जाम झाला. या जमावाने चौकात उभा असलेला हा डंपर पेटवून दिला. दरम्यान, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मयत योजस आणि जखमींना आणले असता या ठिकाणी नातेवायिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, योजसच्या परिवाराचा आक्रोश मन हेलावणारा होता.

पहा व्हिडिओ : https://youtu.be/UjxhgLKroc0?si=SbDubVzeuJtnCukk