Video : सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी होणार सुलभ ; जळगावात मलाबार गोल्डचे पदार्पण !

जळगाव : नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपले आहे. नवरात्रीपासून महत्त्वाच्या अनेक सण-उत्सवाला प्रारंभ होतो. त्यानंतर, दिवाळीपर्यंत उत्सवाची उत्सवांची रेलचेल असते. उत्सवाच्या या प्रर्श्वभूमीवर लोक खरेदीकडे वळतात. यात सोनो खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. अशात या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही देखील सोने आणि मौल्यवान रत्ने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सण-उत्सवाच्या या पार्श्वभूमीवर जळगावात सोने असो की मौल्यवान रत्ने खरेदी करणे असो.. आता सोपे झाले आहे. कारण जगातील ५ व्या क्रमांकाचे ज्वेलरी रिटेलर असलेले आंतराष्ट्रीय दर्जाचे मलाबार गोल्ड अँड डायमंडचे सुवर्ण नगरीत म्हणजे आपल्या जळगावात पदार्पण झाले आहे.

जगभरात ३५० शोरुमचे जाळे

मलाबार गोल्ड अँड डायमंड हा जागतिक दर्जाचा ब्रांड असून मलाबार गोल्ड अँड डायमंडचे जागतिकस्तरावर ३५० पेक्षा अधिक शोरुम आहेत. यात देशात १७० पेक्षा अधिक तर महाराष्ट्रात २५ शोरुम आहेत. यात आता जळगावच्या शोरुमची भर पडली आहे. शहरतील मध्यवर्ती अशा मणियार हाईट्स, बहिणाबाई उद्यानजवळ,रिंगरोड येथे मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या प्रशस्त अशा नवीन शोरुमची भर पडली आहे.

दागिन्यांच्या अनेक व्हरायटीज

मलाबार गोल्ड अँड डायमंड हे गुणवत्ता आणि कलात्मकतेसाठी विशेषत: ओखळले जाते. या ठिकाणील सर्व वयोगटातील ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन बनवण्यात आलेल्या सिग्नेचर ज्वेलरी हे मलाबार गोल्ड आणि डायमंड्सचे खास वैशिष्टय आहे. यासह रोजच्या वापरातील दागिने, पार्टी वेअर, लग्न समारंभासाठी विशेष दागिने जे ब्राईड्स ऑफ इंडिया कलेक्शन म्हणून परिचित आहेत तसेच 18 कॅरेटचे लाईट वेट दागिने अशी विविध प्रकारचे ज्वेलरी कलेक्शन या शोरूममध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर माईन, एरा, एथनिक्स, डिव्हाईन, प्रेशिया, स्टारलेट या उप ब्रांडची उत्पादनेही उपलब्ध आहेत.

महराष्ट्रीयन दागिन्यांचे विशेष कलेक्शन

मालाबार गोल्ड अँड डायमंडमध्ये महराष्ट्रीयन दागिन्यांचे विशेष कलेक्शनही ग्राहकांना अनुभवता येईल. या ठिकाणी प्रसिद्ध ठुशीपासून, महाराष्ट्रीयन नथीपर्यंतचा प्रत्येक दागिना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. ethnix, DIVINE, mine, ERA, PRECIA या पाच विभागांमध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या दागिन्यांची खरेदा करता येणार आहे. यात हस्तकलेचे  सोन्याचे दागिने तुम्हाला ethnix विभागात मिळतील. भारतीय परंपरेचा वारसा जपणारे दागिने  DIVINE विभागात, हिऱ्यांपासून तयार केलेले सुबक अलंकार mine विभागात, अनकट हिऱ्यांपासून तयार दागिने ERA विभागात तर  विविध प्रकारच्या रत्नापासून तयार करण्यात आलेले आकर्षक दागिन्यांचे PRECIA विभागात उपलब्ध होतील.