---Advertisement---

Jalgaon News : जळगावातील श्रीराम वहनोत्सवास ‘या’ तारखेपासून होणार प्रारंभ

by team
---Advertisement---

जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) विद्यमाने अवघ्या कान्हदेशाचे सांस्कृतिक, अध्यात्मिक वैभव असलेला व गेली १५२ वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. हा श्रीराम स्थोत्सव यंदाही उत्साहात होत असून हिंदू धर्मातील अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून सदगुरु श्री संत अप्पा महाराज यांनी शके १७९४ (सन १८७२) मध्ये सुरु केलेला हा संस्थानचा सर्वोच्य मानबिंदू असलेला श्रीराम रथोत्सव यंदा १५२ व्या वर्षांत पदार्पण करीत असून २ नोव्हेंबर पासून वहनोत्सवास प्रारंभ होत आहे.

१२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या पावन दिनी श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या रथोत्सवाच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने भाविक यानिमित्त जळगावला येत असतात. परंपरेप्रमाणे कार्तिक शु. प्रतिपदा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत हा उत्सव संपन्न होईल. या उत्सवात प्रतिदिनी रोज सकाळी पहाटे ५ वाजता काका आरती, प्रभू रामरायांची पूजा अभिषेक, विष्णूसहसहस्त्रनाम तुळसी अर्चना, सकाळी ७ वाजता मंगलारती , दुपारी ११.३० ते १२, माध्यन्ह पूजा, नैवेद्य आरती, दुपारी ४ ते ५ सामुदायीक श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ, संध्याकाळी ५ ते ६ नित्यनेमाने चक्री भजन, संध्याकाळी ६ ते ६.३० संध्यापूजा, धुपारती संध्याकाळी ७ वाजता श्रीराम मंदिरापासून वहन व दिंडीस प्रारंभ होईल, नित्य वहन प्रस्थान आरती परंपरेने श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्या हस्ते होईल.

२ नोव्हेंबर कार्तिक शुद्ध बली प्रतिपदा दिनी पहाटेची उपचार विधी होऊन सकाळी ११ वा. प्रभू रामरायांचे उत्सवमुर्तीस पालखीत विराजमान करून निमखेडी येथील श्रीराम मंदिरात जाऊन श्री सद्गुरू कुवरस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजन पूजन आरती होऊन दुपारी ४ वाजता पालखी जळगाव श्रीराम मंदिरात येईल.

त्यानंतर प्रथम वहन पूजन श्री सद्गुरू आप्पा महाराजांचे वंशज, श्रीराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त, वहिवाटदार, विद्यमान गादिपती, ह.भ.प. मंगेश महाराजांचे हस्ते व आमदार सुरेश भोळे, श्रीराम मंदिराचे विश्वस्त व रथाचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, डॉ. भरत अमळकर, अॅड सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, विजयराव जोशी, जयवर्धन नेवे, रथाचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, श्रीराम रथोत्सवाचे सेवेकरी जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर जळगाव शहरातील विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच असंख्य रामभक्त मंडळी नागरिक उपस्थितीत संपन्न होईल. प्रथम वहन पूजन आरती होऊन, मंदिरातील प्रभू श्रीराम राजांची आरती होऊन, उत्सवमूर्तीस वहनावर विराजमान होऊन वहनापुढे श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी असेल झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी रामभक्त मंडळीसह वहन दिंडी नगर प्रदक्षीणेस निघेल.

वहन मार्ग : श्रीराम मंदिर, भोईटे गढी,कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, भट गल्ली राम मारुती पेठ ,श्रीराम मंदिराचे मागील गल्ली ,रथ चौक, सराफ बाजार मार्गे, श्री भवानी मंदिर येथे वहन पूजन भजन, भारूड, आरती पानसुपारी होऊन, सुभाष चौकातील, सुभाष चौक पतसंस्थाचे विद्यमाने पानसुपारी.

जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान विद्यमाने कार्तिकी प्रबोधिनी एकादशीनिमित्त साजरा होणारा श्रीराम वहन उत्सवानिमित्त वहन चित्र देवतांची डागडुजी, रंगरंगोटी मंदिराची रंगरंगोटी करतांना हा श्रीराम वहन उत्सवास २ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे, १२ नोव्हेंबर दिनी भव्य दिव्य श्रीराम रथयात्रा असून १५ नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमा दिनी श्री गोपाळकाल्याचे कीर्तनाने सांगता होईल. यासाठी श्रीराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त, वहिवाटदार , विद्यमान गादिपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांचे नेतृत्वखाली विश्वस्त भालचंद्र पाटील, भरत दादा अमळकर , अॅड सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, विजय जोशी, जयवर्धन नेवे, रथोत्सव अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, श्रीराम महाराज, विलास चौधरी, मुकुंद धर्माधिकारी, सुजित पाटील, नंदू शुक्ल, अरुण मराठे, राजू काळे, विकास शुक्ल, भानुदास चौधरी, भालचंद्र चौधरी, दिलीप खडके, दिनेश धांडे, विनायक पाटील, भारत बारी, किशोर नाटेकर, भाऊ जावळे, रवींद्र पाटील, कोल्हे भाऊ, बापू चौधरी, राजू कोळी, संजय कोरके, अशोक माळी, कवी कासार, सदाशिव तांबट, उमेश साळी, राजप्रकाश भावसार, धनसिंग ठाकूर,बापू सपके , दत्तू तेली, शिवाजी भोई, दीपक तांबट, उदय पाठक, रामचंद्र जगताप, पप्पू सोनगिरे, विठ्ठल कोळी हे कामकाज पाहत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment