---Advertisement---

Jalgaon News : समाजकंटकांच्या हैदोस! कुंभमेळ्याकडे जाणाऱ्या ट्रेनवर दगडफेक

by team
---Advertisement---

Jalgaon News : देशात सध्या कुंभमेळ्याचा उत्साह आहे. दर १२ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात सामील होण्यासाठी देशभरातून भाविक प्रयागराजला जात आहे. अशात प्रयागराजकडे जाणाऱ्या प्रवाशांसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जळगावात हा प्रकार घडला असून प्रयागराजकडे जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक करण्यात अली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच रविवार १२ जानेवारी रोजी सुरतकडून छपराकडे जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्स्प्रेसवर जळगाव रेल्वे स्थानकाजवळ आली असता अज्ञात समाजकंटकांकडून गाडीवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीमुळे ट्रेनच्या बी १  कोचच्या खिडकीची काच फुटली आहे. या घटनेमुळे कोचमधून प्रयागराज कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रवाशांनी केली सुरक्षाची मागणी

दरम्यान, दगडफेकीच्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दगडफेकीची माहिती प्रवाशांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) दिली आहे. असामाजिक तत्त्वांनी ही दगडफेक केली असून आम्हाला सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा

ताप्तीगंगा एक्सप्रेस जळगाव रेल्वेस्थानकाबाहेर पडताच तीन किलोमीटर अंतरावर दगडफेकीची घटना घडली.
आरक्षित डब्यातील बी १  कोचवर ही दगडफेक झाली त्यामुळे या कोचच्या खिडकीची काच फुटली. सतर्कता बाळगल्याने कोणीही प्रवासी जखमी झाला नाही. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जळगाव रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment