जळगाव : धर्माच्या आधारावर बांगलादेशात सुरु असलेल्या हिंदूंवरील क्रूर जिहादी अत्याचारविरोधात मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
बांगलादेशात हिंदू मंदिराची जाळपोळ, तोडफोड, चोऱ्या, हिंदू महिलांवरील क्रूर अत्याचार, हिंदूंना होणारी अमानुष मारहाण तसेच हिंदूंची सर्वप्रकारे लूट या सारख्या क्रूर अत्याचार होत आहे. या प्रचंड चीड आणणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना बांगलादेशातून रोज नव्याने समोर येत आहेत. बांगलादेशातीलहिंदूंचा मानवधिकार संपूर्णपणे हिरावून व हिसकावून घेतला आहे. या घटनांचे गांभीर्य आणि वेदना जगात पोहोचविण्यासाठी, दुष्कृत्यांचा निषेध करण्यायासाठी या न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू समाजातील सर्व लोकांनी, विविध घटकांनी, सार्वजनिक मंडळानी, संस्थानी व बांगलादेशातील हिंदू अत्याचारविरोधात निषेध करू इच्छिणाऱ्या सर्वांनीच 10 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 3 वाजता जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन निषेध नोंदवावा, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.