Jalgaon ST News : एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत शस्त्रपूजन उत्सहात

जळगाव :  एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून विभागीय कार्यशाळेत विजयादशमी दसऱ्यानिमित्त सालाबादप्रमाणे शस्त्रपूजन करण्यात आले. विभागीय कार्यशाळेत जिल्हाभरातून शेकडो बसेस दुरुस्ती करता नियमितपणे येत असतात. या ठिकाणी बसेसचे सर्व प्रकारचे कामे केले जातात.

विभागीय कार्यशाळेत विविध विभाग कार्यरत असतात, त्यात बॉडी सेक्शन, चेसिस सेक्शन, एफ आय पंप सेक्शन, रिट्राव्हल सेक्शन, टर्नर सेक्शन, बेंच फिटर सेक्शन, इंजिन सेक्शन, टायर सेक्शन, इलेक्ट्रिक सेक्शन, पेंटर सेक्शन, बॅटरी सेक्शन, रेडिएटर सेक्शन, लोहार सेक्शन, विंडो सेक्शन या विभागात शस्त्र पूजा करण्यात आली.

देवाधिदेव विश्वकर्मा की जय हो आणि जय श्रीराम असा गजर करत कर्मचाऱ्यांनी प्रत्येक सेक्शनमध्ये रांगोळ्या टाकून फुलांची सजावट केली होती. याप्रसंगी विभागीय कार्यशाळेचे यंत्र अभियंता किशोर लाला पाटील, सहाय्यक यंत्र अभियंता निलेश चौधरी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पंकज साळुंके यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले.

संपूर्ण विभागीय कार्यशाळेची साफसफाई करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे विविध यंत्रसामग्रीला दर्शनी भागाला ठेवून फुलांनी सजवली होती. दुरुस्तीसाठी आलेल्या सर्व बसेसची साफसफाई करून रंग रंगोटी करण्यात आली. प्रत्येक सेक्शनमध्ये दुरुस्तीचा सामान सजवून ठेवला होता. याप्रसंगी श्री गणेश व दुर्गा आरती करण्यात आली.

यशस्वीतेसाठी संयुक्त कृती समितीकडून सर्वश्री प्रशांत चौधरी, गोपाळ पाटील, प्रदीप दारकुंडे, गोकुळ पाटील, मोहन बिडकर, विलास सोनवणे व योगेश सपकाळे यांनी विशेष योगदान दिले.