---Advertisement---

Jalgaon Zilha Parishad News : महिला अभियंत्याने लगावली उपअभियंत्याच्या कानशिलात, सीईओंनी दिले ‘हे’ आदेश

by team
---Advertisement---

जळगाव : जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात बांधकाम विभागातील महिला कर्मचाऱ्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली होती. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.  हे सर्व नाट्य  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात घडले. दरम्यान, हा सर्व प्रकार या विभागाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी जि. प. सीईओ श्रीअंकित यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचा खुलासा मागवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

जिल्हा परिषदेत या दोन कर्मचाऱ्यांमध्ये ज्या दिवशी वाद झाला. त्या दिवशी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर होते. मात्र, त्यांनी दोन्ही विभागाच्या विभाग प्रमुखांशी झालेल्या प्रकाराबाबत चर्चा करून माहिती जाणून घेतली. खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे संकेत सीईओंनी दिले आहे.

जिल्हा परिषदेत अनेकदा राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये दे दणादण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र दोन कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल झाल्याच्या घटना ऐकिवात नव्हत्या. मात्र आता कर्मचाऱ्यांच्या या राड्याने जिल्हा परिषद वर्तुळात या प्रकरणाचीच चर्चा होती. अहवाल प्राप्त झाल्यानंतर जि. प. प्रशासक या दोन्ही कर्मचाऱ्यांवर काय ? कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment