---Advertisement---
पदवीधर तरुणांसाठी सरकारी बँकेत करिअर सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने मोठ्या प्रमाणात अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमुळे हजारो तरुणांना बँकिंग क्षेत्रात प्रवेशाची सुवर्णसंधी मिळणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेकडून तब्बल ५,१३८ अप्रेंटिस पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी pnbindia.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.
ही भरती एका वर्षाच्या अप्रेंटिसशिप प्रशिक्षण कार्यक्रमासाठी असून उमेदवारांना दरमहा स्टायपेंड दिले जाणार आहे. बँकिंग क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवण्यासाठी ही योजना तरुणांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
या भरती साठी पात्रता व वयोमर्यादा काय असणार ?
पंजाब नॅशनल बँकेकडून जारो झालेल्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. शासन नियमांनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
या भरतीसाठी प्रकीर्या कशी असणार?
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. परीक्षेमध्ये सामान्य जागरूकता, इंग्रजी भाषा, गणित (संख्यात्मक क्षमता) आणि तर्कशक्ती या विषयांचा समावेश असेल. आवश्यकतेनुसार स्थानिक भाषा चाचणी देखील घेतली जाऊ शकते.
अप्रेंटिस उमेदवारांना शाखेच्या ठिकाणानुसार स्टायपेंड दिले जाणार आहे. ग्रामीण, अर्धशहरी व शहरी शाखांसाठी दरमहा ₹१२,३००, तर महानगर शाखांसाठी दरमहा ₹१५,००० स्टायपेंड मिळणार आहे.
या भरतीसाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹९४४ आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस महिला उमेदवारांसाठी ₹७०८, तर अनुसूचित जाती, जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी ₹२३६ शुल्क निश्चित करण्यात आले आहे.बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांनी ही संधी नक्कीच साधावी, असे आवाहन करण्यात येत आहे.









