लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता लवकरच; ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च अंतिम मुदत

---Advertisement---

 

नागपूर, दि. 25 मार्च: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

यासाठी सामाजिक न्याय विभागाने तब्बल 277 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून महिला व बालविकास विभागाच्या प्रणालीवर निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.


या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता. त्यामुळे आता फेब्रुवारीचा हप्ता देखील येत्या काही दिवसांत जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, योजनेचा लाभ सुरळीत मिळावा यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. काही महिलांकडून ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरली गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे अशा लाभार्थींना दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.


आता ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी केवळ काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून, लाभार्थी महिलांनी तातडीने आपली माहिती योग्य प्रकारे अद्ययावत करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---