एलईडी चित्ररथातून समाज कल्याण योजनांचा प्रचार; ग्रामीण भागात जनजागृती मोहीम सुरू

---Advertisement---

 

जळगाव – समाज कल्याण विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या हस्ते एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, समाज कल्याण अधिकारी अमोल कुलकर्णी तसेच समाज कल्याण विभागाचे अधीक्षक राजेंद्र कांबळे यांची उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---