जळगावात विधी सेवा चिकित्सालय (Legal Aid Clinic) चे उद्घाटन

---Advertisement---

जळगाव : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेषान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव पवन एच. बनसोड, यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत गुरुवारी ( 7 आॅगस्ट ) रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, येथे विर परीवार सहायता योजना 2025 अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या मार्फत विधी सेवा चिकीत्सालय (Legal Aid Clinic) चे उदघाटन करण्यात आले.

विधी सेवा चिकीत्सालय आयोजित कार्यक्रमामध्ये पवन एच. बनसोड म्हणाले की, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने देशभरात सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी त्याना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हे विधी सेवा चिकीत्सालय सेवेमुळे माजी सैनिकांच्या कौटुंबीक, जमीन,पेन्शन आणि इतर कायदेशीर विषयावर मार्गदर्शन आणि न्यायालयीन कारवाईसाठी मदत मिळणारअसल्याचे स्पष्ट केले.

तसेच या कार्यक्रमास सहा जिल्हा सैनीक कल्याण अधिकारी संजय रामराव गायकवाड, जवान फाउंन्डेशन अध्यक्ष ईश्वर मोरे, , अॅड. रुपाली कुलकणी, अॅड संदीप पाटील, भारती कुमावत हे उपस्थीत होते. या कार्यक्रमास संजय रामराव गायकवाड, ईश्वर मोरे यांनी उपस्थीतांना सैनिक कल्याण कार्यालयातर्फे पुरविण्यात येणा-या सुविधा या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी प्रमोद ठाकरे, संतोष तायडे, रविंद्र महाजन, सचिन पवार यांनी कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---