---Advertisement---

धरणगाव तालुक्यात हलक्या, मध्यम सरी, पावसाच्या हजेरीने शेतीकामांना वेग

---Advertisement---

धरणगाव  :  जून महिना कोरडा गेल्यानंतर अखेर जूनच्या शेवटी आठवड्यात तालुक्यातील अनेक भागांत मान्सूनचे आगमन झाले. मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. २४ जूननंतर सुरू झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

मात्र, तरी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. शिवाय पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. कोरडवाहु  कपाशी, मका, उडीद, मुग तुर ह्या सारख्या पिकांना पुर्ण ओलावा नसल्याने विरळ झाल्या आहेत. परीणामी शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील पुर्वत्तर व पश्चिम भागातील हलक्या व मध्यम स्वरुपाचा जमीनीत सदर वरील प्रकार जाणवत असल्याने तेथे पिकांची साधणीचे कामे सुरु आहेत त्यावर दमदार पाऊस झाला तरचं पिकांना जीवदान मिळेल असे चित्र उमटु लागले आहे

---Advertisement---

मागील दोन दिवसांपासून रिपरिप पावसाने सुरुवात झाली. दुपारनंतर काही भागांत मोठ्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांना रेनकोट, छत्र्यांचा आधार घ्यावा लागला. दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून पडत होत्या. या पावसाने आधीच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मातीतील ओलावा टिकून राहिल्याने सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी पिकांच्या उगमावर सकारात्मक परिणाम होणार आहे.

दुसरीकडे अद्याप पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही संधी लाभदायक ठरणार आहे. कारण जमिनीत पुरेसा ओलावा तयार झाला आहे. या पावसाने काही भागांतील शेतांत पाणी साचले आहे. जमिनीची मशागत करण्यायोग्य स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप नदी-नाले कोरडे आहेत. जलस्तर वाढण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे.

धरणे, बंधारे यात साठा होण्यासाठी अजून काही दिवस सातत्याने पावसाची अपेक्षा आहे. या पावसामुळे खरीप हंगामाचे चित्र आता अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मका, कापूस, ज्वारी, बाजरी, उडीद मूग यांसारख्या प्रमुख पिकांना बळ मिळणार आहे. शेतकरी सध्या हवामानाच्या अनुकूलतेकडे आशेने पाहत असून, योग्य पावसाने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.

आगामी पाच दिवस दमदार बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी चार ते पाच दिवस पाऊस दमदार बरसेल, जिल्ह्यात जून’चे सरासरी पर्जन्यमान १२३.७ मिलिमीटर असून, आतापर्यंत ८८.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला असल्याचे दिसून येत आहे.

मेमध्ये सरासरी ५.७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात जिल्ह्यात पावसाने मेमध्येच जोरदार हजेरी लावल्यानंतर मृग नक्षत्रात सुरुवातीलाच दडी मारली होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र दोन, तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली, तर गुरुवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. आगामी चार, पाच दिवस पाऊस दमदार बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खरिपाच्या पेरण्यांना आता वेग येणार आहे.

मॉन्सूनपूर्व पावसाने ७० मिलिमीटर अशी दमदार हजेरी लावल्यानंतर मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच हात आखडता घेत काहीशी विश्रांती घेतली होती. तुरळक, मध्यम पावसामुळे बऱ्याच ठिकाणी केवळ बागायती कपाशी वाणासह अन्य वाणांची सरासरी ३४ टक्के होऊन अन्य अन्नधान्यवर्गीय वाणांची पेरणी लांबणीवर पडली होती.

आतापर्यंत जिल्ह्यात  धरणगाव, भुसावळ, एरंडोल, पारोळा, पाचोरा या पाच तालुक्यात सरासरी पर्जन्यमान गाठले आहे, अन्य तालुक्यात पेरणीलायक पाऊस नसल्याने मृग व आर्द्रा नक्षत्रात पेरण्या झालेल्या नाहीत. दोन दिवसांपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  

चार तालुक्यांनी गाठली सरासरी

मॉन्सून दरम्यान जून महिन्याचा अखेर सरासरी १२३.७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. यात जूनच्या शेवटच्या टप्यात भुसावळ १२०.९, एरंडोल १२०.९, पारोळा १२२.९  पाचोरा ११५.७मि.मी. असा पाऊस झाला आहे. तर अन्य अमळनेर, धरणगाव, यावल, रावेर आदी तालुक्यात जून शेवटच्या टप्प्यात सरासरीच्या निम्मेदेखील पाऊस झालेला नसल्याचे चित्र आहे. गुरुवारनंतर शुक्रवार ते सोमवार दरम्यान  ९५ ते ६५ टक्के आर्द्रतायुक्त वातावरण, जोरदार तसेच मध्यम स्वरूपात तसेच शनिवार व रविवार दरम्यान विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होत जोरदार पावसाची शक्यता वेधशाळा अभ्यासकांनी वर्तविली आहे. आगामी सप्ताहातदेखील ढगाळ व काहीसे दमट वातावरणासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासकांनी व्यक्ती केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---