---Advertisement---

जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना ९३ कोटी रुपयांचे कर्ज वितरण

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात जवळपास ३० हजार बचत गट कार्यरत आहेत. १५ तालुक्यांत महिलांना उद्योग व रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी उमेद अभियान अंतर्गत महिलांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले जात आहे. त्यातून उद्योगाची निर्मिती होत आहे.

राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एमएसआरएलएम जुलै २०२५ महिन्यात जळगाव जिल्ह्यातील २ हजार ३४७ स्व यासहायता समूहांना एकूण ९३ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज विविध बँकांच्या माध्यमातून वितरित करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ३० हजार स्वयंसहायता समूह कार्यरत असून हे अभियान जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये प्रभावीपणे राबविले जात आहे.

जून २०२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्राम विकास यंत्रणा आर. एस. लोखंडे यांनी सातत्याने याबाबत आढावा घेऊन कर्मचाऱ्यांच्या मासिक आढावा बैठकीत, स्वयंसहायता समूहांना कर्जवाटप तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अटल पेन्शन योजना यांची १०० टक्के अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, तालुका अभियान व्यवस्थापन कक्षांनी नियोजनबद्ध कामगिरी करून २ हजार ३४७ समूहांना कर्ज वितरण सुनिश्चित केले. यामध्ये पाचोरा व जामनेर तालुक्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अटल पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीताही यशस्वी प्रगती दिसून आली आहे.

विमा व पेन्शनचाही लाभ तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, जळगाव येवील प्रभाग समन्वयक हेमांगी टोकेकर यांनी यशस्वी कामगिरी बजावली. जामनेर तालुक्यातील प्रभाग समन्वयक कैलास गोपाळ यांनी तर बदाम जाधाव यांनी १०० टक्के काम पूर्ण केले आहे. जिल्ह्या परिषदेच्या मार्गदर्शनाखाली एमएसएलएम कामगिरी ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मजबूत आयार करते आहे. कर्जवाटप, विमा योजना व पेन्शन योजनांची प्रभावी अंमलबजावणी ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहांना आर्थिक स्थैर्य देण्याचे ठोस पाऊल करत आहे. जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वालंबी बनविण्याचे काम जिल्ला ग्रामीण विकास यंत्रणा करीत आहे. या माध्यमातून महिलांना छोटे उद्योग उभारण्यासाठी बळ मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---