भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दोन रेल्वे गाडयांचा फेऱ्यांमध्ये वाढ कार्यात आली आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सोमवारी (२ जून) रोजी प्रसिद्धिपत्र जारी केले आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- मडगाव विशेष आणि हडपसर- हिसार विशेष गाड्यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- मडगाव विशेष आणि हडपसर- हिसार विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- मडगाव आणि हडपसर- हिसार दरम्यान चालणाऱ्या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई विशेष गाड्यांचा विस्तार – ४ सेवा
ट्रेन क्रमांक 01103 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – मडगाव साप्ताहिक विशेष (दर सोमवारी) दिनांक २६ मे २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता ९ जून २०२५ पर्यंत चालविण्यात येणार आहे. (२ सेवा)
ट्रेन क्रमांक 01104 मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष (दर रविवारी) दिनांक २५ मे २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता ८ जून २०२५ पर्यंत चालविण्यात येणार आहे. (२ सेवा)
हडपसर -हिसार- हडपसर विशेष गाड्यांचा विस्तार – १० सेवा
ट्रेन क्रमांक 04726 हडपसर – हिसार साप्ताहिक विशेष (दर सोमवारी) दिनांक २६ मे २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता ३० जून २०२५ चालविण्यात येणार आहे. (५ सेवा)
ट्रेन क्रमांक 04725 हिसार -हडपसर साप्ताहिक विशेष (दर रविवारी) दिनांक २५ मे २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक २९ जून २०२५ धावणार आहे. (५ सेवा)
ट्रेन चालण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
आरक्षण : विशेष गाड्या क्रमांक 01103 आणि 04726 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in संकेतस्थळावर बुकिंग करता येईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांना विशेष ट्रेन सेवांचा लाभ घेण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.