---Advertisement---

जिल्ह्यातील १३ तालुक्यांत लम्पीचे संक्रमण, १६ पशुधनांचा मृत्यू, शीघ्र कृती दलाच्या पाच पथकांकडून लसीकरण

---Advertisement---

---Advertisement---

जिल्ह्यात गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव १३ तालुक्यांमध्ये दिसून आला आहे. आतापर्यंत लम्पी संसर्गबाधेमुळे १६ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या साथरोग नियंत्रणासाठी प्रशासन सतर्क झाले असून, जिल्ह्यात बाधित पशुधनाचे विलीगीकरण, लसीकरण, गोठा स्वच्छता व फवारणी मोहिमेसह लम्पी रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे संक्रमण जुलैच्या दुसऱ्या सप्ताहात प्रथमत तीन तालुक्यांमध्ये दिसून आले होते. यात ३४ पशुधन बाधीत तर एका पशुधनाचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत जिल्ह्यात लम्पीचा प्रादूर्भावाचा विळखा १३ तालुक्यांना पसरला असून, आजअखेर ५५५ पशुधन या आजाराने बाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यांपैकी औषधोपचाराअंती २४२ पशुधन बरे झाले आहे, तर १६ पशुधनांचा मृत्यू झाला आहे.

१३ तालुक्यांत ७० प्रतिबंधित क्षेत्रे

जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, एरंडोल, जळगाव या तालुक्यांमध्ये सर्वाधिक जनावरांना लम्पी चर्मरोग विषाणूची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या ठिकाणी संसर्ग केंद्राच्या पाच किलोमीटर परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला आहे. परिसरात लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

गोठा स्वच्छता, जैवसुरक्षा व निर्जंतुकीकरणावर भर

लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनावर त्वरित औषधोपचार करण्यात येऊन आजाराचे संक्रमण इतरत्र होऊ नये, यासाठी गोठा स्वच्छता, जैवसुरक्षा व विविध जवसुरक्षा निर्जंतुक औषधांची फवारणी करावी. योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमबजावणी, बाधित जनावरांचे तत्काळ व योग्य औषधोपचार केल्यास, अबाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केल्यास या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येणे शक्य असल्याचे निदर्शनास आले असून, त्यादृष्टीने सर्वांनी उपाययोजना कराव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

उपचारासाठी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

सध्या जिल्हयात लम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भावाने २९७ बाधीत पशुधनावर उपचारानंतर बहुतांश पशुधन बरे होत आहेत. सर्व शासकीय संस्थांमध्ये लम्पी चर्मरोगावर उपचार करण्यासाठी आवश्यक औषध पुरवठा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतील १. केद्र पुरस्कृत योजनेतील ५ फिरत्या पशुचिकित्सा पथकाद्वारे पशुपालकांच्या दारात उपचार करण्यात येत आहे. पशु पालकांनी लम्पी चर्मरोग बाधित पशुधनास उपचार करणेसाठी १९६२ या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग अधिका-यांनी केले आहे. यासंदर्भात नागपूर पशुवैद्यकिय विद्यालयाचे संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी औषधोपचार, लसीकरण सेवा सुश्रूषा या विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले.

शीघ्र कृती दलाची ५ पथके दाखल

जिल्ह्यात लम्पी साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत प्रत्येक तालुक्यात शीघ्र कृती दल कार्यरत झाले आहे. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने मनुष्यबळ कमी आहे, तेथे जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यात अधिकारी, कर्मचारी यानुसार गट तयार करण्यात आले असून, सद्यःस्थितीत १३ तालुक्यांतील २९७ पशुधनावर उपचार सुरू आहेत.

गुरांचे आठवडे बाजार बंद

जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये पुढील सूचना येईपर्यंत जिल्ह्यातील एरंडोल, धरणगाव, पारोळा, रावेर येथील गुरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

  • केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार बाधित गाव व बाधित गावालगतच्या ५ किलोमीटर परिसरातील गोवर्गीय पशुधनास प्रतिबंधात्मक लसीकरण गोट पॉक्स लसीद्वारे (उत्तरकाशी स्ट्रेन) करण्यात येते. जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार चार लाख ९६ हजार ७३१ इतके गोवर्गीय पशुधन असून, २०२५-२६ मध्ये चार लाख १० हजार ८०० लसमात्रा वितरित केल्या आहे. आतापर्यंत तीन लाख ८५ हजार ४७१ पशुधनांवर लसीकरण झाले आहे. ज्या ठिकाणी रोगाचा उद्रेक दिसून येत आहे व ज्या पशुधनास लसीकरण झालेले नाही, त्यासाठी तालुकानिहाय लस मागणी घेण्यात आली असून, नव्याने लसमात्रा खरेदी करून पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
    डॉ. प्रदीप झोड (जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---