महाराष्ट्र बोर्डाचा दहावी-बारावी निकाल: संभाव्य तारखा समोर; विद्यार्थ्यांनी ठेवावा अधिकृत घोषणेवरच विश्वास

---Advertisement---

 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. अद्याप बोर्डाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार 2026 च्या निकालाबाबत संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांच्या अंतराने दहावीचा निकाल प्रसिद्ध होऊ शकतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही आधी बारावी आणि नंतर दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


निकाल जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी बोर्डाकडून अधिकृत वेळ आणि तारीख जाहीर केली जाते. तसेच, निकाल दरवर्षीप्रमाणे दुपारी १ वाजता ऑनलाईन प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.


गेल्या वर्षांचा आढावा :

2025 : बारावी – 5 मे, दहावी – 13 मे
2024 : बारावी – 21 मे, दहावी – 27 मे
2023 : बारावी – 25 मे, दहावी – 2 जून


यंदा बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान, तर दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान पार पडल्या आहेत. त्यामुळे परीक्षेनंतर साधारण दोन महिन्यांत निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असताना विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---