नाशिक धर्मातर प्रकरणात मलेशियाचा संबंध उघड, एसआयटीच्या चौकशीतील माहिती, आरोपींच्या खात्यात परदेशातून पैसा

---Advertisement---

 

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात् टीसीएस बीपीओ कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात मलेशियाचा संबंध उघड झाला आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत आरोपींच्या खात्यात परदेशातून पैसा आल्याचे समोर आल्याने याप्रकरणी मनी लॉण्ड्रिगच्या अनुशंगाने तपास सुरू करण्यात आला.

एसआयटीने तपासादरम्यान व्हॉट्सॲप चॅट्स आणि एका परदेशी धर्मोपदेशकाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. सुरुवातीला हे प्रकरण केवळ कामाच्या ठिकाणी होणारा छळ वाटत होते, परंतु आंतरराष्ट्रीय संबंधाच्या शक्यतेमुळे आता ते अधिक गंभीर झाले आहे. पोलिस आणि एसआयटी दोघेही या परदेशी संबंधाचा सखोल तपास करीत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

व्हॉट्सॲप चॅट्समध्ये इम्रान नावाच्या एका संशयिताचा उल्लेख होता, ज्याचा संबंध मलेशियाशी आहे. या व्यक्तीची पीडित कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉलद्वारे ओळख करून देण्यात आली होती. मलेशियाच्या संबंधाची पुष्टी करण्यासाठी डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे.

व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि व्हिडिओ कॉल लॉग्सची छाननी केली जात आहे. इम्रानची भूमिका के वळ संवादापुरती मर्यादित होती की तो या कथित टोळीला सूचनाही देत होता, हे निश्चित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. परदेशी निधीच्या पैलूचाही तपास केला जात आहे.

१२ पीडितांची ओळख पटली

आतापर्यंत १२ पीडितांची ओळख पटली असून ९ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या तक्रारींमध्ये लैंगिक छळ, लग्नाच्या नावाखाली जबरदस्तीने संबंध ठेवणे आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकणे यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मलेशियन संबंधाची भूमिका असून त्या दिशेने तपास सुरू आहे. चॅट्समध्ये मलेशियाशी संबंधित सूचना असल्याचे आढळून आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---