Martyr’s Day : ३० जानेवारीला रोजी हुतात्मा दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Martyr’s Day जळगाव :  महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करण्यात आली.  गांधी यांची पुण्यतिथी हि संपूर्ण भारत देशांत हुतात्मा दिन म्हणून साजरा केली जाते. या दिवशी महात्मा गांधींच्या स्मृतींना उजाळा देऊन राष्त्राद्वारे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी २ मिनिटे मौन पाळले जाते. 1948 मध्ये 30 जानेवारीला नथुराम गोडसेने गांधीजींना दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी प्रार्थनेला जात असताना गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती.

हा दिवस केवळ गांधीजींच्या पुण्यतिथीचा दिवस नसून तर शहीद दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो.  या दिवशी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री दिल्लीतील राजघाटावर उपस्थित राहून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करतात.  यासोबतच देशभरातील सशस्त्र दलांतील जवानांना देखील शहीदांच्या योगदानाबद्दल आदरांजली व्यक्त केली जाते.


महात्मा गांधींच्या योगदानामुळे भारताला सत्य, अहिंसा आणि स्वातंत्र्याच्या मार्गावर चालायला प्रेरणा मिळाली. त्यांचा शहीद होण्याचा दिवस म्हणजेच हुतात्मा दिन, ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अविस्मरणीय असे आहे.

अर्थात, भारतात 30 जानेवारी रोजी एक अद्वितीय शहीद दिवस म्हणून नोंद घेतली जाते, जो 23 मार्चच्या हुतात्मा दिनापेक्षा वेगळा आहे. 23 मार्च 1931 रोजी स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. त्यानंतर 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो, ज्यामुळे दोन्ही हुतात्मा दिनाला वेगळा इतिहास आहे.

मौन पाळून आदरांजली 
गुरुवार ३० जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ११ वाजता तुम्हाला मौन पाळायचे आहे. तुम्हीच नाही, तर शालेय शिक्षक, विद्यार्थी, सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांनी देखील मौन पाळणे अपेक्षित आहे.  राज्य शासनाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.

इशारा भोंगा वाजेल
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. यानुसार जळगाव महापालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या आवाहानुसार यावर्षीही गुरुवार, ३० जानेवारी सकाळी ठिक ११  वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा. ३० जानेवारीला सकाळी ११  वाजता पाळण्यात यावयाच्या मौन (स्तब्धता) ची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी ठिक १०.५९ पासून ११ वाजेपर्यंत महापालिकेतर्फे इशारा भोंगा वाजविण्यात येईल. सदर इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना/शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यामधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे.

 

आदरांजली गंभीर व योग्य आदराने द्या
सकाळी ठिक ११.०२ मिनिटांनी मौन (स्तब्धता) संपल्यासंबंधीचा इशारा भोंगा ११.०३ मिनिटांपर्यंत वाजविण्यात येईल. जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे मौन (स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते निदेश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता) पाळून देण्यात येईल, याची दक्षता घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना या परिपत्रकात नमूद करण्यात आल्या आहेत.