जळगावात ओबीसी जनगणना, युजीसी कायदा व TET मुद्द्यांवर भव्य मोर्चा

---Advertisement---

 

जळगाव : ओबीसींची जातीनिहाय जनगणना, युजीसी कायदा आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) या प्रमुख मागण्यांसाठी जळगाव येथे बहुजन समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चाच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.


जी.एस. ग्राऊंड येथून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम आणि राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नवीन बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोर्चात विविध सामाजिक, धार्मिक संघटना, शिक्षक संघटना तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


मोर्चातील प्रमुख मागण्या अशा होत्या:
ओबीसींची जातीनिहाय जनगणना तात्काळ लागू करावी
युजीसी कायद्याबाबत केंद्राने स्पष्ट भूमिका घ्यावी
२०११ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET मधून सूट द्यावी
मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी चव्हाण मॅडम यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शेकडो बहुजन बांधव व भगिनी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---