रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वाचे निर्देश…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होत असून त्यातून निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. जिल्ह्यातील जामनेर–पाचोरा–बोदवड या नव्या रेल्वे मार्गासह भुसावळ–खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन या प्रकल्पांमुळे विशेषतः भुसावळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. संजयजी, जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे तसेच रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी मांडलेल्या तक्रारी, मागण्या व सूचनांची नोंद घेण्यात आली.

---Advertisement---

 

रेल्वे रुळांमुळे शेतीत जाण्या-येण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी बोदवड, भुसावळ व वरणगाव परिसरात आवश्यक ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल (ROB) व भुयारी मार्ग (RUB) उभारण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला.
भुसावळ ते खंडवा या विस्तारित रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी शक्यतो टाळाव्यात किंवा अत्यल्प प्रमाणातच वापरल्या जाव्यात, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. ज्या जमिनी अपरिहार्यपणे घेतल्या जातील, त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला देण्याचे स्पष्ट करण्यात आले.

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि भविष्यातील उपजीविका सुरक्षित राहावी, हाच या बैठकीमागचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---