मध्यपूर्वेतील संघर्षामुळे अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने, भारतीय रिझर्व्ह बँकेचा इशारा

---Advertisement---

 

मुंबई : मध्यपूर्वेतील सततचा संघर्ष आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेसमोर वाढलेला ऊर्जा खर्च, कच्च्या मालाच्या किमतींचा दबाव, व्यापार प्रवाहातील व्यत्यय आणि वित्तीय बाजारातील परिणाम यासारखी आव्हाने निर्माण होऊ शकतात, असा अशारा भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जारी केलेल्या एका बुलेटिनमध्ये दिला आहे.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे मार्च महिन्यात जागतिक पुरवठा साखळ्यांवरील ताण वाढला होता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात या तणावात काहीशी घट झाल्याचे दिसून आले, असे रिझर्व्ह बँकेच्या एप्रिलच्या बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या ‘अर्थव्यवस्थेची स्थिती’ यावरील एका लेखात नमूद करण्यात आले.

देशांतर्गत आर्थिक घडामोडींना अनेक क्षेत्रांमध्ये लवचिकता दर्शवली, तर इतर काही क्षेत्रांमध्ये मात्र त्यात काहीशी मंदी दिसून आली, असे त्यात म्हटले आहे. संघर्षाची तीव्रता आणि कालावधी तसेच यामुळे ऊर्जा व इतर पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान या बाबी महागाई आणि आर्थिक वाढीच्या संभाव्य स्थितीमध्ये जोखीम निर्माण करतात, असेही त्यात नमूद केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---