जळगावच्या राजकीय वर्तुळातुन मोठी बातमी: माजी महापौर ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर जामीन मंजूर…!

---Advertisement---

 

जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड समोर आली आहे. ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊस छापेमारी प्रकरणात अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.

जळगाव शहराजवळील ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर झालेल्या गाजलेल्या छापेमारी प्रकरणात अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सरिता माळी-कोल्हे यांनी दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी एल. के. फार्महाऊसवर छापा टाकला होता. येथे बेकायदेशीर कॉल सेंटर चालवून विदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा आरोप होता. या कारवाईत ललित कोल्हे यांच्यासह कोलकाता येथील चार संशयितांसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला होता.

अटकेनंतर ललित कोल्हे हे नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अखेर त्यांना जामीन मंजूर केला. दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर लढ्यानंतर मिळालेल्या दिलास्यामुळे कोल्हे यांच्या समर्थकांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ललित कोल्हे लवकरच कारागृहाबाहेर येण्याची शक्यता असून, या निर्णयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---