दौऱ्यावर असताना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली ? नेमकं काय घडलं ?

---Advertisement---

 

भाजपा नेत्या पंकजा मुंडे या छत्रपती संभाजी नगर येथे हेलिकॉप्टरने जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. लातूर येथे त्यांचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ त्या जाणार होत्या व प्रचारासाठी जात असताना ही हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडलेली आहे मात्र या प्रचारासाठी पंकजा मुंडे या दुसऱ्या हेलिकॉप्टरने सभांसाठी रवाना झाल्या आहेत.

भाजप नेत्या तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती ही समोर आली आहे. पंकजा मुंडे ह्या लातूर येथे जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी जाणार होत्या. पंकजा मुंडे ह्या छत्रपती संभाजीनगर येथून लातूर साठी हेलिकॉप्टरने जाणार होत्या. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सध्या जिल्हा परिषद निवडणूक ह्या लवकरच होणार आहेत आणि त्यामुळे प्रचारासाठी पंकजा मुंडे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि लातूर जिल्ह्यात त्यांच्या विविध ठिकाणी सभा होणार आहे अनेक भागात प्रचार सभेचे आयोजन देखील करण्यात आलेला आहे आणि याच प्रचार सभेसाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या पंकजा मुंडे यांचा हेलिकॉप्टर हे आकाशात झेपावणार तेवढ्यातच त्यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झालं यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आलं.

यामुळे आता लातूर येथे असलेल्या नियोजित सभांच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी तातडीने पंकजा मुंडे या दुसऱ्या हेलिकॉप्टरने सभास्थळी उपस्थित राहणार आहेत. नियोजित कार्यक्रमांना विलंब जरी झाला असला तरी सर्व सभांना पंकजा मुंडे ह्या उपस्थिती लावणार आहेत असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे, मात्र वेळीच तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने कार्यकर्त्यांसह समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---