---Advertisement---
शहरातील आकाशवाणी चौकातील श्री स्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोरून कुरियरचे बॉक्स चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपन्यांचे ४ महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत.
नेमकी घटना काय?
काही दिवसांपूर्वी आकाशवाणी चौकातून ५ मोबाईल असलेले कुरियरचे बॉक्स चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा (CCTNS No. ६३/२०२६) दाखल करण्यात आला होता.
अशी झाली कारवाई
जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने या चोरीची कबुली दिली. त्याने चोरून नेलेले ४ मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.
जप्त करण्यात आलेले मोबाईल:
VIVO Y२०० (१ नग)
OPPO F२१ PRO (१ नग)
OPPO A६ (२ नग)
एकूण किंमत: ९६,९९६/- रुपये.
तपास पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोहे महेंद्र पाटील, नरेश सोनवणे, संतोष सोनवणे, तेजस मराठे, प्रवीण जाधव, प्रशांत लाड आणि चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहे महेंद्र पाटील करत आहेत.









