---Advertisement---

धावत्या रेल्वेतील प्रवाशांच्या हातावर फटका मारुन करायचे चोरी, अखेर अडकले पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात प्रवासी चालत्या रेल्वेच्या दरवाजात मोबाईल पाहणाऱ्या प्रवाशांच्या हाताला काठी मारून मोबाईल पडल्यावर घेऊन पसार होण्याचे प्रकार वाढले होते. असाच प्रकार जळगाव रेल्वे स्टेशनवर घडला आहे. यामुळे सतर्क होऊन रेल्वे सुरक्षा बलाद्वारे पाळत ठेवण्यात आली होती. यात त्यांनी दोघां अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या दोघां संशयितांकडूनडून 65 हजार रुपये किमतींच्या आयफोनसह सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

हातावर फटका मारुन चोरी करण्याच्या प्रकरणात दोन सराईत बाल गुन्हेगारांना जळगाव रेल्वे सुरक्षा दलातर्फे ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी (12 जून ) रोजी अमृतसर-बांद्रा एक्स्प्रेस (गाडी 11058) मध्ये प्रवास करत असलेल्या दानिश आबीद खान या प्रवाशाला या दोघांनी लाकडी काठीने मारहाण करत त्याचा 65 हजार रुपये किंमतीचा आयफोन हिसकविला. या घटनेत प्रवासी जखमी झाला होता. या प्रकरणाचा तपास रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक आयुक्त, निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता.

---Advertisement---

पोलिसांनी जळगाव आउटर परिसरात सीसीटीएनएस रेकॉर्डवरून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. यानंतर शनिवारी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले दोघे जळगावमधील असून त्यांचे वय अनुक्रमे 15 व 16 वर्षे आहे. यापूर्वीही ते अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अडकले होते. त्यांच्याकडून मारहाणीमध्ये वापरलेली लाकडी काठी, चोरी गेलेला आयफोन तसेच आणखी सहा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

हे फोनही चोरीचे असल्याचा पोलिसांना संशय आहे. संपूर्ण मुद्देमाल आणि दोन्ही संशयीत मुलांना पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे. रेल्वे पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---