---Advertisement---
पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे मंगळवारी (१७ जून) रोजी बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबीर घेण्यात आले. शिबिरात आ. किशोर पाटील यांच्या हस्ते भांड्यांचे वाटप करण्यात आले.
इमारत बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या मजुरांसाठी गृह उपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. किशोर पाटील हे होते. त्यांच्या हस्ते भांड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन बंडू केशव सोनार यांच्या प्रयत्नातून करण्यात आले होते.
---Advertisement---
कार्यक्रमास मा. नगरसेवक महेश प्रकाश सोमवंशी, युवानेता सुमित किशोर पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, प्रविण ब्राह्मणे, योगेश पाथरवाट, दिलीप परदेशी आदी उपस्थित होते. यावेळी १५० बांधकाम मजुरांना गृह उपयोगी किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व शिबिर व्यवस्थापन हर्षल सुनील, दामोदर कुणाल, मंगल धनगर, मनीष प्रभूलाल भोई, राज सोमवंशी, सागर बंडू सोनार यांनी केले होते.
या उपक्रमामुळे कामगार बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेऊन गरजूंना मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरला.