जळगावात मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा थाटात शुभारंभ; ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा उत्साह

---Advertisement---

 

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जळगाव शहरात मनसेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

शहरातील काव्य रत्नावली चौक येथे सायंकाळी ५ वाजता या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला. ॲड. बाविस्कर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सदस्य नोंदणी प्रक्रियेची पाहणी केली.

या नोंदणी मोहिमेत मनसेचे आजी-माजी पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी सेना, महिला सेना तसेच विभाग आणि शाखा अध्यक्षांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना पासपोर्ट साईज फोटो सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक युवक आणि महिलांनी उत्साहाने मनसेचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी बोलताना ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी राज ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच जळगाव शहराच्या प्रश्नांसाठी सक्षम लढा देण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, जळगाव महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, विभाग अध्यक्ष उमेश आठरे, विशाल जाधव, राहुल चव्हाण, दीपक राठोड, खुशाल ठाकूर, अशुतोष जाधव, प्रदीप पाटील, विकास पाथरे, जितेंद्र पाटील, रज्जाक सय्यद, शाखाध्यक्ष युसूफ खाटीक, बादशाह शाह, पवन साफकळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---