---Advertisement---
जळगाव : रजा मागण्यासाठी आलेल्या विवाहितेचा कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. बांभोरी प्र.चा शिवारातील एका कंपनीच्या सेक्युरीटी कॅबीनमध्ये हा संतापजनक प्रकार सप्टेंबर २०२५ सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडला होता. पीडितेच्या तक्रारीनुसार याप्रकरणी गुरुवारी (२ मार्च) धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
३५ वर्षीय विवाहिता जळगाव येथे वास्तव्यास असुन बांभोरी येथील या कंपनीत कार्यरत आहे. पीडितेची मुलगी आजारी आहे. तिच्या देखभालीसाठी दोन दिवस रजा मिळावी, म्हणून पीडित महिला संशयित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कॅबीनमध्ये गेली. पीडितेने दोन दिवसाची रजाची मागणी केली असता संशयित अधिकाऱ्याने पीडितेशी असभ्य वर्तन करत निंदनीय कृत्य केले. तु मला खुष कर मी तुला दहा दिवसांची सुटी देईल. आणि त्याची पगारात कपातही करणार नाही, असे म्हणाला. पीडितेने अधिकाऱ्याला थारा दिला नाही. येथील सर्व पोलीसवाले, गुंड आणि पॉलीटीशन माझ्या ओळखीचे आहेत, अशी दमबाजी केली. विवाहितेवर अतिप्रसंग केला. तक्रार केल्यास जबरदस्तीने काढलेले आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तक्रारीनुसार याप्रकरणी वरीष्ठ अधिकारी जनार्दन (पूर्ण नाव गाव माहित नाही) याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार प्रवीण तांदळे हे तपास करीत आहेत.









