Monsoon Update: खान्देशच्या शेतकऱ्यांनो सावधान! ३०-३१ मार्चदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा

---Advertisement---

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून अनेक ठिकाणी पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना आता हवामान विभागाकडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. येत्या दोन दिवसांत काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


सध्या राज्यातील काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले असून ही स्थिती आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिणेकडील भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस कर्नाटक आणि तेलंगणा सीमेलगतच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील भागांमध्ये अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे.


३० मार्चला हवामान बदलाचे संकेत
दि. ३० मार्च रोजी दुपारनंतर राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये या बदलाचा विशेष प्रभाव दिसू शकतो. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.


३१ मार्चलाही परिणाम कायम

दि. ३१ मार्च रोजी देखील या अवकाळी हवामानाचा परिणाम काही भागांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने खान्देशसह संबंधित भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे कृषी विभागाने सांगितले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. तसेच वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.


हवामानातील या बदलामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी शेती पिकांसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---