---Advertisement---

धक्कादायक : ९ वर्षीय चिमुकलीसह आईने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

by team
---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल शहरात एका महिलेने आपल्या ९ वर्षीय मुलीसह गळफास घेत गुरुवार, २६ रोजी जीवनयात्रा संपविल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा धक्कादायक प्रकार जहांगीरपुरा भागात घडला आहे. मानसिक तणावातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जहांगीरपुरा भागात वास्तव्य असलेल्या सपना माळी (वय ३३ वर्ष) या महिलेने तिच्या ९ वर्षीय मुलगी केतकी माळीसह आत्महत्या केली. पोलिसांना तपासादरम्यान एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. याबाबत ही चिठ्ठी मृत महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिली असेल असा तर्क लावला जात आहे.

आठ वर्षांपूर्वी सपना माळी यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर त्या आपल्या मुलीसह माहेरी वास्तव्याला होत्या. सपना व तिची मुलगी केतकी ह्या दोघी एरंडोल येथील महादेव मंदिर भागात राहत होत्या. दरम्यान, दुपारी सपनाचा भाऊ दुपारी त्यांच्या घरी आला, यावेळी त्याला ही घटना समोर दिसली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  या घटनेत सपना माळी ह्या तणावग्रस्त असल्याचा अंदाज पोलिसांनी काढला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment