मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोघांना अटक, दोन दुचाकी जप्त

---Advertisement---

 

जिल्हापेठ पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल चोरीप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(4) अन्वये 26 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जळगाव शहरातून चोरी झालेल्या मोटारसायकलींच्या तपासात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान मलिक अल्ताफ अहमद अन्सारी (रा. भोलगाव) आणि मोहम्मद जुनैद अब्दुल रहमान (रा. भोलगाव) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून हीरो स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल (क्र. MH19BS9733) जप्त करण्यात आली.

दरम्यान, पोलिस कोठडी रिमांडदरम्यान आरोपींनी आणखी एक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने टीव्हीएस रायडर मोटारसायकल (क्र. MH19JF3609) देखील जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मोटारसायकलींची किंमत सुमारे 1 लाख 50 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---