Mantralaya News : मंत्रालयात चाललंय तरी काय ? आमदारांसह उपसभापतींची तिसऱ्या मजल्यावरून उडी

Mantralaya News:  मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाच्या काही आमदारांसह विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुंबईतील मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उड्या घेतल्या आहे. सत्ताधारी पक्षातील या पदाधिकाऱ्यांनी थेट मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या घेतल्याने मंत्रालयात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदारांनी हे पाऊल का उचललं जाणून घेऊया.

विधानसभा उपाध्यक्षांसह आमदारांनी का उचललं हे पाऊल?

अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुंबईतील मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उड्या घेण्याचं कारण म्हणजे आरक्षणाता मुद्दा. राज्य सरकारने धनगर आणि धनगड एकच असल्याचा शासन आदेश काढला आहे. अशात धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षणाच्या मुद्द्याला आदिवासी आमदारांनी विरोध दर्शविला आहे. धनगर समाजाला अनुसूचित संवर्गातून आरक्षण देवू नये. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी ही मागणी आहे.

तसेच गेल्या 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांकडून पेसाभरती संदर्भात आंदोलन करण्यात येत आहे. पेसा कायद्याअंतर्गत भरती करा, या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत. मात्र सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याचे आज आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उड्या घेत हे अनोखे आंदोलन केले. दरम्यान, प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या सहा दिवसांपासून आम्ही वेळ मागत आहोत. मात्र, ते देखील आम्हाला भेट देत नाहीत, असे म्हणत आमदरांनी नाराजी व्यक्त करत हे आंदेलन केले.