---Advertisement---

जळगाव मनपा निवडणूक पडणार लांबणीवर

---Advertisement---

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना तयार करण्याला १३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने सार्वत्रिक निवडणूक ही लांबणीवर पडणार आहे. शासनाने मुदतवाढीबाबत सुधारीत आदेश दिल्याने इच्छुकांचा पुन्हा एकदा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.


जळगाव शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासनाने १२ जून रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महापालिका प्रशासन कामालाही लागले होते. मनपा निवडणुकीसाठी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक समिती नेमण्यात आली आहे. यात सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, शहर अभियंता आर. टी. पाटील, शाखा अभियंता योगेश वाणी, प्रोग्रामर म्हणून पियुष पाटील अशा सात जणांचा समावेश आहे.

---Advertisement---

या समितीकडून प्रभाग रचना तयार करण्यासाठी आत्तापर्यंत तीन ते चार बैठका घेण्यात आल्या. ही प्रक्रिया सुरू असतांना सोमवारी शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभाग रचनेसंदर्भात सुधारीत आदेश जारी केला. या आदेशानुसार आता अंतीम प्रभाग रचना ही एक महिना पुढे ढकलण्यात आली असून ती ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत प्रसिध्द केली जाणार आहे. या मुदतवाढीमुळे आरक्षण सोडत, प्रारूप मतदार यादीचाही कार्यक्रम उशीराने होणार असल्यामुळे मनपाची सार्वत्रिक निवडणूक देखिल लांबणीवर पडणार आहे.

मुदतवाढीचा प्रभाग रचना कार्यक्रम

प्रगणक गटाची मांडणी करणे ११ ते १६ जून, प्रारुप प्रभाग रचना तयार करणे, जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे १७ ते १८ जून. स्थळ पाहणी- १९ ते ३० जून, गुगलमॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे – १ जुलै ते ५ जुलै
नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागहद्दी जागेवर जावून तपासणे-६ ते २४ जुलै
प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून समितीने स्वाक्षऱ्या करणे २५ जुलै ते ७ ऑगस्ट
प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागास पाठविणे- ८ ते १२ ऑगस्ट
प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने निवडणूक आयोगास पाठविणे १३ ते २५ ऑगस्ट
प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व हरकती मागविणे ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर
प्राप्त हरकतींवर सुनावणी घेणे ९ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर
सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफ़ारशी विचारात घेऊन अंतिम केलेली प्रभाग रचना नगरविकास विभागास पाठविणे-१९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर
अंतीम प्रभाग रचना प्रसिध्दी ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---