Taloda Crime News :नंदुरबार जिल्ह्यात बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त

तळोदा : तालुक्यातील तळोदा-धडगाव रस्त्यावरील कोठार आश्रम शाळेजवळ वाहनाची तपासणी करीत असतांना गोवा बनावटीचे विदेशी मद्य सहा चाकी वाहनातून अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आल्याने वाहनासह 53,84,800 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अधिकची माहिती अशी की, 16 ऑक्टोबर रोजी तळोदा धडगाव रस्त्यावर कोठार शिवार कोठार आश्रम शाळेजवळ उत्पादन शुल्क विभागाद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यात भारतबेंज 1214R कंपनीचा सहा चाकी वाहन क्रमांक MH 13 CU 1701 हे वाहन तपासणी करण्यात आली. या वाहनातील गोवा राज्य बनावटीचे रॉयल ब्ल्यू व्हिस्की 180 मिलीचे एकुण 851 खोके व वाहनासह एकुण 53 लाख 84 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाईत महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुक्लचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी,नाशिक विभागांचे विभागीय उपायुक्त यु. आर. वर्मा, नंदुरबार राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या पथकाने नंदुरबार विभागाचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर, बीट क्रदुय्यम निरीक्षक पी. व्ही. मोरे, बीट क्र.2 चे दुय्यम निरीक्षक ए. एस. गायकवाड, खेडदिगर सिमा तपासणी नाका दुय्यम निरीक्षक एच. पी. घरटे,स हाय्यक दुय्यम निरीक्षक आर. एल. राजपूत, जवान संदिप वाघ, हितेश जेठे, धनराज पाटील, अजय रायते यांनी कारवाई केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास बीट क्र. 3 चे दुय्यम निरीक्षक पी व्ही मोरे करीत आहेत.