Jalgaon News: राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन

जळगाव : सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा हातातील हक्काचा रोजगार कमी होत चालला आहे प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे. या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र राज्यात खोके सरकार स्थापन झाल्यापासून सरकारच्या दुर्लक्षित कारभाराने मोठ मोठे प्रकल्प गुजरातला स्थलांतरित होत आहेत. यासोबत वर्षानुवर्ष कार्यरत उद्योगधंदे बंद करून गुजरातला स्थलांतरित होत आहेत. या प्रकल्पांमधील अनेक कुशल कामगार व अधिकारी बेरोजगार झाले आहेत. तसेच नवीन मजूर प्रकल्प सुरु झाले नाहीत. पण पंतप्रधान व सहकारी मंत्री गुजरात राज्याचे असलेले मोदी व शहा यांच्या राज्याकडे म्हणजे गुजरातकडे अनेक उद्योग धंदे नवीन कारखाने महाराष्ट्रात राज्यातून पाळवित आहे. या अशा निर्णयाने महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार होत असून रोजगार नसल्याने व वर्षानुवर्ष सुरू असलेले उद्योग स्थलांतरित होत असल्याने त्रस्त झाले आहेत. अशा निर्णयाने हक्काचा रोजगार या शासनाने चुकीच्या निर्णयाने गमवावा लागत आहे. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनातील घोषणा 
होश में आवो होश आवो खोके सरकार होश में आवो..!,  रोजगार आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा..!, खोके मिळतात म्हणून रोजगार पळवतात..!,  गुजरातला उद्योग पळवणाऱ्या खोके सरकारचा जाहीर निषेध असो.!, रोजगार द्या नाही तर खुर्च्या खाली करा.!,  खोके सरकार हटवा..!, नोकऱ्या वाचवा..!,  रोजगार आमच्या हक्काचा.. नाही कोणाच्या बापाचा..!,  सरकार हटावा..नोकऱ्या वाचवा..!

हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व जळगाव महानगर अध्यक्ष रिकु चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील,अरुण लक्ष्मण पाटील संचालक उत्पन्न बाजार समिती,साहिल पटेल, चेतन पवार,आकाश हिवाळे,पंकज राजाराम तनपुरे,शांताराम ठाकूर,शिवराम बारी, प्रमोद सावळे, भूषण आनंदा पाटील, गोलू पवार, अमोल पाटील, हितेश जावळे, मतीन सय्यद व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.